
हुतात्मा बाबू गेनू समाजवादी शिक्षण संस्था ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाची दिशा ठरली आहे. शेतकरी व कष्टकरी वर्गातील मुलांना आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शिक्षण, संस्कार व कौशल्यांच्या माध्यमातून उज्वल भविष्याची संधी उपलब्ध करून देणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक समता, स्वावलंबन आणि सर्वांगीण विकास घडवण्यासाठी संस्था सतत प्रयत्नशील आहे




























